राजगडावरील संजीवनी माचीच्या नाळेतील थरारक प्रवास.

Описание к видео राजगडावरील संजीवनी माचीच्या नाळेतील थरारक प्रवास.

#sanjivniMachi #rajgadFort #RajgadToTorna
राजगडच्या संजीवनी माचीतील नाळेमधला थरारक प्रवास अनुभवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. तत्पूर्वी त्याविषयी थोडी माहिती...
।दुर्गराज_राजगड... श्रीशिवछत्रपतींच्या स्वप्नातून साकार झालेला दुर्ग. राजगडाची संजीवनी माची म्हणजेच शिवनिर्मित दुर्गकलेचे ऊत्तम उदाहरण आहे. जे जे उत्तम ते ते सर्व या माचीच्या बांधकामात दिसते. माचीवर जागोजागी पाण्याची टाकी आहेत. मजबूत तटबंदी आहे. दुहेरी बुरुजही आहेत.
माचीच्या तटबंदीशेजारी कोरलेली नाळ तर केवळ अद्भुत ! हा बांधकामप्रकार सहसा अन्य किल्ल्यांवर बघायला मिळत नाही. तटबंदी व माची यादरम्यानचा कातळ खोलवर खोदून त्यामध्ये ठेवलेली बोळीसारखी अरुंद जागा/वाट म्हणजे नाळ. आतमधून काही ठिकाणी चिरेबंदी दगडे वापरून ती अजून अरुंद केली जाते.
नाळेच उपयोग दुहेरी तटबंदीसारखा होतो. म्हणजे बाहेरून हल्ला होऊन तटबंदी पडली तरी आतली तटबंदी सुरक्षित असणार. आणि तटबंदी पाडून शत्रूंनी नाळेत प्रवेश केला तर वरून हल्ला करून त्यास मारता येईल, एखाद्या भुयारात फसल्याप्रमाणे त्याची अवस्था होईल...
राजगडच्या संजीवनी माचीवर असलेली नाळ आतून कशी आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास चॅनेल Subscribe करा.

#दख्खन देश#

Комментарии

Информация по комментариям в разработке