Vidhan Parishad Election : Devendra Fadanavis की MVA ? विधानपरिषद निवडणुकीत कोण बाजी मारणार?

Описание к видео Vidhan Parishad Election : Devendra Fadanavis की MVA ? विधानपरिषद निवडणुकीत कोण बाजी मारणार?

#BolBhidu #DevendraFadnavis #VidhanParishadElection2024

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. घोडेबाजाराची शक्यता ओळखून आमदारांना हॉटेलवर शिफ्ट केलं जात आहे. निवडणुकीत मत बाद होऊ नयेत म्हणून किंवा कोणत्या आमदाराने कोणत्या उमेदवाराला मतदान द्यायचं आहे. दुसऱ्या पसंतीची मतं कोणाला द्यायची आहेत हे ठरवण्यासाठी आमदारांना आता मतदानाच प्रशिक्षण दिलं जाणार आहे. २०२२ साली देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय कौशल्य पणाला लावून विरोधी पक्षात असतांना देखील महाविकास आघाडीची मत फोडली होती.ज्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली.

तसाच काहीसा खेळी यावेळी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस करतील अशी महायुतीच्या नेत्यांना अपेक्षा आहे. पण, यंदा मात्र फाईट कट टू कट आहे. महायुतीचे ९ उमेदवार कोणत्याही परिस्थितीत निवडून आणण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. ते पुन्हा एकदा २०२२ सारखा डाव खेळतील आणि यशस्वी करून दाखवतील अशी अपेक्षा महायुतीच्या समर्थकांना आहे. पण, त्यांचा हा डाव यशस्वी ठरेल का? यावेळी स्थिती कशी वेगळी आहे? आणि यंदा फडणविसांचा डाव कशा प्रकारे फसू शकतो? पाहूयात या व्हीडीओतून...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке