Yashomati Thakur यांचा Amravati मध्ये राडा, जनसंपर्क कार्यायलयाचं कुलूप तोडलं, नेमकं प्रकरण काय ?

Описание к видео Yashomati Thakur यांचा Amravati मध्ये राडा, जनसंपर्क कार्यायलयाचं कुलूप तोडलं, नेमकं प्रकरण काय ?

#BolBhidu #YashomatiThakurAmravati #YashomatiThakurvsRana

लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांना पाडून काँग्रेसच्या बळवंत वानखडेंना निवडून आणण्यासाठी यशोमती ठाकूर यांनी सगळी ताकद लावली. या निवडणुकीत वानखडेंनी राणांचा पराभवही केला. त्यामुळं आता विधानसभा निवडणुकांपर्यंत तरी अमरावतीत सगळं काही शांत असेल असं वाटत होतं. पण लोकसभेच्या विजयानंतर काही दिवसांतच अमरावतीत नवीन राडा सुरू झाला आहे. खासदार असताना नवनीत राणांच्या ताब्यात असलेलं जनसंपर्क कार्यालय निवडून आल्यानंतरही बळवंत वानखडे यांना न मिळाल्यामुळं यशोमती ठाकूर चांगल्याच आक्रमक झाल्या.

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह बळवंत वानखडे आणि यशोमती ठाकूर यांनी कुलूप तोडून जनसंपर्क कार्यालयाचा ताबा घेतला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर ठाकूर यांनी हा राडा केल्यामुळं अमरावतीत नवीन वादाला सुरुवात झाली आहे. पण ज्या जनसंपर्क कार्यालयावरुन हा वाद सुरू झाला आहे त्याचा ताबा नवनीत राणा यांनी आधीच सोडल्याचं सांगण्यात आलंय. मग तरीही हा वाद उफाळण्याचं कारण काय, वानखडेंना या जनसंपर्क कार्यालयाचा ताबा का देण्यात आला नाही, या संपूर्ण प्रकरणाची माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке