Amit Shah यांनी Sharad Pawar यांच्यावर टीका केल्यानंतर Ajit Pawar आणि Shah भेट, नेमकं काय ठरतंय ?

Описание к видео Amit Shah यांनी Sharad Pawar यांच्यावर टीका केल्यानंतर Ajit Pawar आणि Shah भेट, नेमकं काय ठरतंय ?

#BolBhidu #AjitPawar #AmitShah

गेल्या महिन्याभरापासून लोकसभेनंतर बॅकफूटवर गेलेले अजितदादा पुन्हा फ्रंटफुटवर खेळायला लागलेत. विधासभा निवडणूकींच्या तोंडावर दादांच्या अंगावर आलेलं गुलाबी जॅकेट, बारामतीतली सभा त्यानंतर महिलांच्या भेटीगाठी, विधानसभेसाठी हायर केलेली अरोरांची कंपनी, पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा या सगळ्याने दादा कमबॅक करतील का अशा चर्चा झाल्या. पण दादांच्या या बदलेलल्या रूपावरून कौतुकापेक्षा त्यांच्यावर टिकाच जास्त झाली, रांगडे मोकळे ढाकळे दादा आता एका कंपनीच्या इशाऱ्यावर चालणार का असा प्रश्न उपस्थित झाला.बरं इतक्याच बातम्यांपुरते दादा मर्यादित राहिले नाहीत कारण महायुतीत ते जागावाटपात कमी जागा घेतील अस एका भाजप नेत्याने खाजगीत पत्रकारांना सांगितलं, त्यांचेच आमदार असणारे अतुल बेनके आणि विलास लांडे दोन्ही पवारांच्या एकत्रित येण्याच्या वल्गना करायला लागले.

इकडे मंत्रीमंडळ बैठकीत गिरीश महाजन आणि अजित दादांच्यात झालेल्या हमरीतुमरीची बातमी आली. तिकडे पुण्यात अमित शहांनी भाजपच्या अधिवेशनात शरद पवारांवर टिका केली आणि लगोलाग दादा दिल्लीला पोहोचले. महिनाभरापासून दादा प्रतिमा सुधारण्याचा, विधानसभेसाठी डाव टाकण्याचा प्लॅन आखत असताना अमित शहा त्यांच्यावर पाणी फेरून गेले…पण नक्की झाल काय ? अमित शहांसमोर दादांनी काय डिंमाड केलीये? दादांची इच्छा शहा पुर्ण करतील काय ? समजून घेऊ या व्हिडिओतून

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке