प्रांजु प्रदनुला सोडून निघालो लावणीला😍|मुसळधार पावसात केली भाताची लावणी- Sakhari, Mandangad (Konkan)

Описание к видео प्रांजु प्रदनुला सोडून निघालो लावणीला😍|मुसळधार पावसात केली भाताची लावणी- Sakhari, Mandangad (Konkan)

प्रांजु प्रदनुला सोडून निघालो लावणीला 😍 | मुसळधार पावसात केली भाताची लावणी - Sakhari, Mandangad (Konkan) सध्या गावी लावणीची कामे जोरात सुरू आहेत. कोकणात मुसळधार पाऊस लागतोय. फोड बेर झाली की लावणीच्या कामांना जोर धरला जातो. पावसाळ्यातील कोकणातील नजारे बघण्यासारखे असतात. आम्ही सकाळी नाश्ता करून वर्षा आणि मी साखरीला लावणी करायला निघालो. वर्षा पहिल्यांदा पदुला सोडून दिवसभर कामाला निघाली होती. सकाळी अगोदर आमच्या शेतावर प्रांजु प्रदनुला भेटून आलो. आमच्या शेताची बेर करायला दोघे मामा आले होते. प्रदनु शेतावर गेल्यावर जाम खुश होतो. आमच्या आंबवली गावावरून आम्ही स्कुटीने साखरीला गेलो. साखरीला पोहोचलो तेव्हा जोरात पाऊस आला. शेतीची कामे करताना लोकं डाले करून शेती करतात म्हणजे सोबत शेती करतात. वर्षाची आई सोबत डालेकरी आहेत त्यांची लावणी करायला आम्ही साखरीला गेलो होतो. दिवसभर शेतीची कामे केली. लावणी केली. चिखल केला. गवत काढले. भात खणतात कसे ते दाखवले. दुपारी जेवायला आम्ही घरी गेलो. वर्षाने चुलीवर जेवण तयार केले. चुलीवर अंड्याची भुर्जी बनवली. बाहेर पाऊस जोरात लागत होता. आम्ही गरमागरम जेवण जेवलो आणि थोडा वेळ आराम केला. आम्ही गावातील आमच्या नातेवाईकांना भेटलो. हितगुज केले. पुन्हा शेतावर जाऊन काम केले. शेतात काम करत असताना संध्याकाळचे सहा कसे वाजले समजलेच नाही. प्रदनु घरी के करत असेल असे वाटले. मामींनी पोरांना खाऊ बांधून दिला. आम्ही शेतवरून घरी आलो. आता परतीचा पुन्हा प्रवास, स्कुटीवर केला. संध्याकाळी अतिशय नयनरम्य असा नजारे बघत गावचा प्रवास केला. आमच्या गावी पोहोचलो तेव्हा दोघे मुले खूप खुश झाली. प्रदनु आम्ही शेतावरून घरी आलो की, असाच जाम खुश होतो. संध्याकाळी चहा झाला. आजचा दिवस अगदी मजेशीर गेला. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आमच्या गावची पारंपरिक लावणी दाखवली आहे. दुपारचे घरचे चुलीवरचे जेवण दाखवले आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #BhatachiLavani
#Bhatlavani #MusaldharPaus #sforsatish

मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.

  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Комментарии

Информация по комментариям в разработке