Sale Deed: खरेदी खत कसं तयार करतात? खरेदी खतानंतर जमिनीची रेजिस्ट्री कधी रद्द होऊ शकते?

Описание к видео Sale Deed: खरेदी खत कसं तयार करतात? खरेदी खतानंतर जमिनीची रेजिस्ट्री कधी रद्द होऊ शकते?

#bbcmarathi #saledeed #kharedikhat #खरेदीखत #landregistration
खरेदी खत हा स्थावर मिळकतीच्या म्हणजेच जमिनीच्या किंवा घराच्या मालकी हक्काचा प्रथम पुरावा असतो.
खरेदी खत झाल्यानंतरच जमिनीचे मालकी हक्क एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केले जातात.
त्यामुळे कोणत्याही स्थावर मालमत्तेचा व्यवहार करताना सगळ्यात आधी तिचं खरेदी खत पाहिलं जातं.
खरेदी खतावर जमिनीचा व्यवहार किती तारखेला, कोणत्या दोन व्यक्तींमध्ये, किती क्षेत्रावर आणि किती रुपयांना झाला याची सविस्तर माहिती असते.
पण, हे खरेदी खत करण्याची प्रक्रिया कशी असते? दुय्यम निबंधकांच्या कार्यालयात मालमत्तेच्या व्यवहाराची रजिस्ट्री पार पडल्यानंतर ती रद्द करता येऊ शकते का? जाणून घेऊया.
ही आहे बीबीसी मराठीची #गावाकडचीगोष्ट-१२०

लेखन, निवेदन – श्रीकांत बंगाळे
एडिटिंग – राहुल रणसुभे
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке