Lok Sabha Session: BJP ने बहुमत गमावल्यामुळे PM Modi विरोधकांसोबत जुळवून घेतील, यात किती तथ्य आहे?

Описание к видео Lok Sabha Session: BJP ने बहुमत गमावल्यामुळे PM Modi विरोधकांसोबत जुळवून घेतील, यात किती तथ्य आहे?

#BolBhidu #PMModi #ParliamentSession

४ जूनला लोकसभेचा जो काही निकाल लागला आहे तेव्हापासून विरोधी पक्षांमध्ये प्रचंड आनंदाच वातावरण आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना काँग्रेसने ९९ जागा जिंकल्याच्या आनंदापेक्षा मोदींना आणि भाजपला बहुमतापेक्षा कमी जागांवर रोखल्याचा जास्त आनंद झाल्याचं बोललं जातंय. निकाल लागल्याच्या दिवसपासून चर्चा होती की आता मोदी थोडी सॉफ्ट भूमिका घेणारा, विरोधकांना लोकसभेत अधिक स्पेस देणार, मोदी विरोधकांशी जुळवून घेणार अशा अनेक चर्चा सुरू होत्या. पण, निकाल लागून आता १ महिना उलटला आहे. पण, पंतप्रधान मोदी काही अजून सॉफ्ट भूमिका घेतांना दिसून येत नाहीयेत.

मंत्रिमंडळात जेव्हा खातेवाटप करण्यात आलं तेव्हा देखील मोदींना जेडीयू आणि टीडीपीला अनेक महत्त्वाची खाते द्यावी लागतील असं बोललं जात होतं. अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, गृहमंत्री अशा महत्त्वाच्या खात्याचे मंत्री बदलले जातील अशी देखील चर्चा होता. पण, असं काहीही झालं नाही. मोदींनी एकही महत्त्वाच्या खात्याच्या मंत्र्यांमध्ये कोणताही बदल केला नाही. यासह अशा अनेक घटना आहेत ज्या दाखवून देतात की संसद असो की सरकार दोन्ही ठिकाणी अजून मोदींचंच वर्चस्व असल्याचं दिसून येतंय. त्या घटना नक्की कोणत्या आहेत पाहूयात या व्हिडीओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке