Bangladesh मधले Hindu नागरिक भारताच्या सीमेवर दाखल, भारतात प्रवेश मिळणार ? सरकारची भूमिका काय ?

Описание к видео Bangladesh मधले Hindu नागरिक भारताच्या सीमेवर दाखल, भारतात प्रवेश मिळणार ? सरकारची भूमिका काय ?

#BolBhidu #BangladeshProtest #BangladeshHinduViralVideo

बांग्लादेशातील स्थिती आता दिवसेंदिवस चिघळत चालल्याचं पहायला मिळतंय. शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून मोहोम्मद युनूस यांनी शपथ घेतल्यानंतरही बांग्लादेशातील हिंसाचार शांत होण्याचं नाव घेत नाही आहे. आंदोलकांनी बांग्लादेशच्या सरन्यायाधीशांना राजीनामा देण्यासाठी अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर सरन्यायाधीशांनी राजीनामा देण्याची घोषणाही केली आहे. आता कोणत्याही देशात हिंसाचार झाला की त्याचे सगळ्यात जास्त परिणाम भोगावे लागतात ते तिथल्या महिला, लहान मुलं आणि अल्पसंख्याकांना. त्यामुळं बांग्लादेशही त्याला अपवाद नसल्याचं आता दिसून येतंय. बांग्लादेशात शेख हसीना यांची सत्ता गेल्यानंतर आता तिथल्या हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन अशा अल्पसंख्यांक समाजावर होणारे हल्ले वाढल्याचं दिसून येतंय. आंदोलक विद्यार्थ्यांनी या समाजाच्या रक्षणाची जबाबदारी घेतली होती.

पण आंदोलनाच्या आडून रॅडिकल फोर्सेस आणि हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकांच्या घरावर हल्ले करत असल्याच्या, महिलांवर अत्याचार करत असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळं आता बांग्लादेशी हिंदू बीएसएफच्या जवानांना भारतात येऊ देण्यासाठी विनंती करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर येत आहेत. पण हे व्हिडिओ आहेत कुठले, बांग्लादेशातील हिंदू भारतात येण्यासाठी का धडपडतायंत, त्यांना भारतात घेता येणार का, भारत सरकारची भूमिका काय, समजून घेऊयात या व्हिडिओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке