Babajani Durrani यांचा Sharad Pawar गटातला प्रवेश विधानसभेसाठी Ajit Pawar यांना डॅमेज करणार का ?

Описание к видео Babajani Durrani यांचा Sharad Pawar गटातला प्रवेश विधानसभेसाठी Ajit Pawar यांना डॅमेज करणार का ?

#BolBhidu #BabajaniDurraniNews #SharadPawarvsAjitPawar

परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय. त्यांनी संभाजीनगरमध्ये जाऊन शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश केलाय. बाबाजानी दुर्रानी यांचा पक्षप्रवेश हा अजित पवारांना मोठा धक्का मानला जातोय. दोन दिवसांपूर्वी जयंत पाटील परभणीच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात त्यांनी बाबाजानी दुर्रानी यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. त्यानंतर दुर्रानी यांच्या पक्षप्रवेशांच्या हालचालींना वेग आला. सुरुवातीला ही भेट केवळ स्नेहभोजनासाठी होती, यात कोणतीही राजकीय चर्चा झाली, असा दावा दुर्रानी यांच्याकडून केला होता. पण आज अखेर त्यांनी अजित पवारांचं घड्याळ काढून टाकत हाती तुतारी घेतलीय.

"शरद पवारांना सोडून गेलेले अनेक पाहिले, ते पुन्हा विधानभवनात दिसले नाहीत. ते शून्य झाले. बरं झालं, मी शून्य होण्याआधी परत आलो, असं विधान दुर्रानी यांनी पक्षप्रवेशाच्या वेळी केलं. त्यामुळं लोकसभेच्या आधी निलेश लंकेंनंतर आता विधानसभेच्या आधी दुर्रानी यांच्या रुपात अजित पवारांचा पहिला आमदार फुटलाय. पण ह्या एका प्रवेशामुळे अजित पवार गट वैचारीकदृष्ट्या बॅकफुटला जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. शिवाय आगामी काळात अजित पवार गटाची गळती आणखी वाढणार असल्याचं बोललं जातंय. पण बाबाजानी दुर्रानी यांनी अजित पवारांची साथ का सोडली? ते कोण आहेत? त्यांची राजकीय ताकद काय ? आणि एका पक्षप्रवेशामुळे अजित पवार गट कसं डॅमेज होऊ शकतं, पाहुयात या व्हिडीओतून.


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке